लहानपणीची वेणी सैल होते,
केस स्वातंत्र्य पसंत होऊ लागतात।
ढळू नये म्हणून खांद्यावरचा पदर,
हाताने धरून ठेऊ लागतात।।
नव्या नजरा, नव्या भावना,
सारं काहीं नवं असतं।
मनाला गुदगुल्या करणारं,
आपलं कुणी हवं असतं।।
निर्णय चुकतील की असतील बरोबर
याचा नसतो काही नेम।
कोवळं मन, कोवळी पालवी,
अन् कोवळं कोवळं प्रेम।।
खुप छान. ....
ReplyDeleteThank you...
Delete